Knowledge Centre

  • E0A4ACE0A481E0A495E0A4BE20E0A486E0A4A3E0A4BF20E0A4AEE0A581E0A4A6E0A4A4E0A4A0E0A587E0A4B5E0A580E0A482E0A49AE0A58020E0A4B8E0A581E0A4B0E0A495E0A58DE0A4B7E0A4BFE0A4A4E0A4A4E0A4BE

    बँका आणि मुदतठेवींची सुरक्षितता

    बँका आणि मुदतठेवींची सुरक्षितता ‘सुरक्षित’ समजल्या गेलेल्या मुदतठेवीमधे गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये सध्या प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे. पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (PMC) बँकेवर अचानक रिझर्व बँकेने निर्बंध घालून त्यांच्या कर्जवितरणातील घोटाळा उघड केला. त्याचपाठोपाठ शेअर बाजारात सुचीकृत असलेल्या लक्ष्मीविलास बँकेवर देखील निर्बंध लागू झाले. या लागोपाठच्या घटनांनी सामान्य गुंतवणूकदार पुरता भांबावून गेला. PMC बँकेच्या खातेदारांना स्वतःच्या खात्यातील पैसे देखील काढणे…

  • E0A4AEE0A4B9E0A4BEE0A497E0A4A1E0A58DE0A4AFE0A4BE20E0A49CE0A580E0A4B5E0A4A8E0A4B6E0A588E0A4B2E0A580E0A49AE0A58DE0A4AFE0A4BE20E0A49CE0A4BEE0A4B3E0A58DE0A4AFE0A4BEE0A4A4

    महागड्या जीवनशैलीच्या जाळ्यात

    महागड्या जीवनशैलीच्या जाळ्यात  सध्याचे जग हे झगमगीत, चंदेरी दुनियेने भारलेले, जाहिरातबाजीने व्यापून गेलेले आहे. जगातील सर्व कंपन्या भारताकडे एक मोठी बाजारपेठ म्हणून बघतात आणि या विश्वातील आपली ओळख ही केवळ एक खरेदीदार अशी उरली आहे. त्यामुळेच विविध क्लृप्ती वापरून, जाहिरातींचा मारा करून, किंवा आभासी कल्पना मनात भरवून विविध गोष्टी, किंवा सेवा खरेदी करण्यासाठी आपल्याला उद्युक्त…

  • E0A497E0A581E0A482E0A4A4E0A4B5E0A4A3E0A581E0A495E0A580E0A49AE0A58DE0A4AFE0A4BE20E0A496E0A587E0A4B3E0A4BEE0A4A4E0A4B2E0A58720E0A4B8E0A4BEE0A4A420E0A4A8E0A4BFE0A4AFE0A4AE

    गुंतवणुकीच्या खेळातले सात नियम

    गुंतवणुक विश्वाचे नियम सध्या शेअर बाजारातील हवा नरमगरम आहे, आर्थिक मंदीची चर्चा सुरु आहे आणि इक्विटी म्युच्युअल फंडांतील गुंतवणूकदार कपाळाला हात लावून बसले आहेत. ‘दोन-तीन वर्षे चालु ठेवलेल्या SIP मधे नुकसान कसे काय दिसतेय?’ असा जाब देखील अनेक जण विचारत आहेत. काहींना आपले नशीब खराब वाटतेय, तर काहींना आपण फसवले तर गेलो नाही ना याची शंका येतेय. म्युच्युअल…

  • E0A4B5E0A589E0A4B0E0A587E0A4A820E0A4ACE0A4ABE0A58720E0A4AFE0A4BEE0A482E0A49AE0A58720E0A497E0A581E0A482E0A4A4E0A4B5E0A4A3E0A581E0A495E0A580E0A49AE0A58720E0A4A7E0A4A1E0A587

    वॉरेन बफेट आणि गुंतवणुकीचे धडे

    वॉरेन बफेट आणि गुंतवणुकीचे धडे  शेअर्स किंवा स्टॉक मार्केट गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकानेच वॉरेन बफेट यांचं नाव ऐकलेलं असतं. आजच्या घडीच्या जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीत गणना होणाऱ्या वॉरेनना गुंतवणूकविश्वाने \’ओरॅकल ऑफ ओमाहा\’ असं  नामाभिधान प्रदान केलं आहे. एक गुंतवणूकदार म्हणून वॉरेननी मिळवलेलं यश अद्वितीय असेच आहे. वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात करणाऱ्या…

  • E0A4B9E0A4BE20E0A495E0A4BEE0A4B3E0A4B9E0A58020E0A4B8E0A4B0E0A587E0A4B2

    हा काळही सरेल!

    पुन्हा एकदा इक्विटी मार्केट मधे मोठी पडझड आणि एकामागून एक जागतिक तसेच देशांतर्गत वाईट बातम्यांची रीघ सुरु झाली आहे आणि पुन्हा एकदा सामान्य गुंतवणूकदारांमधे गोंधळाचं वातावरण पसरलं आहे. \’पुन्हा एकदा\’ म्हणण्याचं कारण म्हणजे २०१८च्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात अशीच जोराची पडझड झाली होती आणि निरनिराळ्या वाईट बातम्यांचं पेव फुटलं होतं. तेव्हा \’झी मराठी दिशा\’ मधे मी \’धीर…

  • E0A497E0A581E0A482E0A4A4E0A4B5E0A4A3E0A582E0A49520E0A486E0A4A3E0A4BF20E0A49CE0A58BE0A496E0A580E0A4AE

    गुंतवणूक आणि जोखीम

    गेल्या आठवड्यात आपण बघितलं बाजारातील जोखीम आणि आपल्या आयुष्यातील इतर व्यवहारातील जोखीम यांच्यात अनेक साम्य आहेत. आपले स्वतःचे वाहन जसं रस्त्यावर चालवायला बाहेर काढलं की त्यावर कधी ना कधी लहान सहान ओरखडे हे पडणारच असतात. त्यापायी आपले लक्ष विचलित होऊ देण्यापेक्षा ज्या गोष्टींवर आपला पूर्ण ताबा आहे त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणं, तिथं चूक होऊ नये…

  • E0A4ACE0A4BEE0A4ACE0A58220E0A4B8E0A4AEE0A49DE0A58B20E0A487E0A4B6E0A4BEE0A4B0E0A587

    बाबू समझो इशारे

    बाजार, गुंतवणूक आणि जोखीम — भाग २ शेअर बाजार म्हटलं कि जोखीम आली. पण बहुतेक सामान्य गुंतवणूकदार केवळ \’सुखाचे सोबती\’ असल्याप्रमाणे वागतात. सुखाच्या काळात, म्हणजेच बाजार वरवर जात असताना, गुंतवणूकदारांच्या तोंडी \’ये दोस्ती हम नही तोडेंगे\’ असे शब्द असतात. पण दुःखाच्या काळात, म्हणजेच बाजारातील पडझडीच्या काळात, तेच \’हम आपके है कौन?\’ असं विचारायला लागतात. अशा…

  • E0A4AFE0A58BE0A497E0A58DE0A4AF20E0A4B5E0A587E0A4B320E0A4B8E0A4BEE0A4A7E0A4A3E0A48220E0A4AEE0A58DE0A4B9E0A4A3E0A49CE0A58720E0A495E0A4BEE0A4AF

    योग्य वेळ साधणं म्हणजे काय

    शेअर बाजारात गुंतवणूक म्हणजे जास्तीची जोखीम. ही थिअरी आजकाल सर्वांना तोंडपाठ असते. मात्र बहुसंख्य गुंतवणूकदारांमध्ये ही जोखीम उचलायची तयारी फक्त बाजार वर जातानाच असते. बाजारात पडझड सुरु झाली की या लोकांची चुळबुळ सुरु होते. मार्केट पुन्हा कधी वर जाणार, पुन्हा जागतिक मंदी येणार का, अमक्या चॅनेल वर पुढील दोन वर्षे खराब जातील सांगितलं मग गुंतवणूक…

  • E0A4B8E0A581E0A4B0E0A495E0A58DE0A4B7E0A4BFE0A4A420E0A4AEE0A581E0A4A6E0A58DE0A4A6E0A4B220E0A486E0A4A3E0A4BF20E0A4A8E0A4BFE0A4AFE0A4AEE0A4BFE0A4A420E0A489E0A4A4E0A58DE0A4AAE0A4A8E0A58DE0A4A8

    सुरक्षित मुद्दल आणि नियमित उत्पन्न

    निवृत्तीपश्चात गुंतवणुकीचे पर्याय  गेल्या लेखात आपण निवृत्तीनंतर गुंतवणूक करताना कसा विचार करायला हवा ते बघितले. भविष्यातील कालावधीचा कप्प्या-कप्प्यांमध्ये विचार केल्यामुळे योग्य गुंतवणूक धोरण ठरवून रास्त पर्याय निवडण्यास मदत होते. या गुंतवणुकी करताना आपल्यासाठी प्राधान्यक्रम हा मुद्दलाची सुरक्षितता, रोखता आणि नियमित उत्पन्न अशा प्रकारे असतो. त्याशिवाय चलनवाढीला तोंड देण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूकदेखील करावी लागते आणि इन्कम टॅक्स…

  • E0A4A8E0A4BFE0A4B5E0A583E0A4A4E0A58DE0A4A4E0A580E0A4A8E0A482E0A4A4E0A4B0E0A49AE0A58720E0A486E0A4B0E0A58DE0A4A5E0A4BFE0A49520E0A4A8E0A4BFE0A4AFE0A58BE0A49CE0A4A8

    निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन

    निवृत्तीपश्चातचे आर्थिक नियोजन गेल्या आठवड्यात आपण पहिले की महागाईचा रेटा आणि वाढते आयुष्यमान यामुळे निवृत्तीनंतर लागणाऱ्या निधीचा अंदाज कसा बांधावा आणि त्याप्रमाणे कमाईच्या वर्षांमध्ये आपल्याला किती आणि कशी गुंतवणूक करायला हवी. मात्र हे सगळे करून जेव्हा सेवानिवृत्ती होते तेव्हा एवढी वर्षे कष्ट घेऊन तयार केलेल्या निधीचे गुंतवणूक नियोजन देखील योग्य पद्धतीने करणे गरजेचे होते. आज…

  • E0A4A8E0A4BFE0A4B5E0A583E0A4A4E0A58DE0A4A4E0A58020E0A486E0A4A3E0A4BF20E0A4A8E0A4BFE0A4AFE0A58BE0A49CE0A4A8

    निवृत्ती आणि नियोजन

    रिटायरमेंट आणि प्लानिंग आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने विचार केल्यास ढोबळमानाने आपल्या आयुष्याचे तीन भाग पडतात. वयाच्या बाविशी-पंचविशी पर्यंतचा शिक्षणाचा काळ – जेव्हा आपण स्वतः मध्ये गुंतवणूक करत असतो. त्यापुढील साधारण साठीपर्यंतची सुमारे  ३५ वर्षे ही आर्थिक कमाई करण्यासाठी आणि त्यापुढील २०-२५ वर्षे ही सेवानिवृत्ती किंवा रिटायरमेंटची. यातल्या मधल्या आर्थिक कमाईच्या काळात आपल्या पुढील पिढीचे शिक्षण आणि…

  • E0A497E0A581E0A482E0A4A4E0A4B5E0A4A3E0A582E0A49520E0A486E0A4A3E0A4BF20E0A49AE0A581E0A495E0A580E0A49AE0A58DE0A4AFE0A4BE20E0A495E0A4B2E0A58DE0A4AAE0A4A8E0A4BE

    गुंतवणूक आणि चुकीच्या कल्पना

    गुंतवणूक आणि चुकीच्या कल्पना समाज माध्यमं आणि वृत्तपत्र, टीव्ही अशी पारंपरिक माध्यमांमधून गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर अर्थसाक्षरतेचा प्रचार आणि प्रसार झाला आहे. त्यामुळे बहुसंख्य समाजापर्यंत अनेक संकल्पना पोचल्या आहेत. खरेतर या सगळ्या माहितीचा भडीमार सातत्याने सुरु आहे. मात्र या एकमार्गी संभाषणामुळे गुंतवणूकदारांच्या सवयी कितपत बदलत आहेत? तर फारशा नाहीत. याचे एक महत्त्वाचे कारण आपण…

  • E0A496E0A4B0E0A49A20E0A495E0A4BE20E0A4AEE0A58020E0A485E0A4B0E0A58DE0A4A5E0A4B8E0A4BEE0A495E0A58DE0A4B7E0A4B0

    खरंच का मी अर्थसाक्षर

    आर्थिक साक्षरतेविषयी अनास्था: अज्ञान की अविश्वास? सध्या गुंतवणूक विश्वातील एक घटना मोठ्या चर्चेचा विषय झाली आहे. एका प्रसिद्ध आर्थिक सल्लागार कंपनी आणि तिच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांविरुद्ध तिच्या गुंतवणूकदारांनी बंगलोरमधे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ह्या सर्व अतिश्रीमंत वर्गातील गुंतवणूकदारांना त्या कंपनीतील सल्लागारांनी जाणूनबुजून चुकीची माहिती देऊन प्रचंड जोखमीच्या योजनेत पैसे गुंतवायला लावले आणि त्यातून त्यांचं मोठं…

  • E0A4A8E0A58BE0A495E0A4B0E0A58020E0A495E0A4B0E0A58220E0A495E0A58020E0A4B5E0A58DE0A4AFE0A4B5E0A4B8E0A4BEE0A4AF

    नोकरी करू की व्यवसाय?

    नोकरी करू की व्यवसाय? गेल्या काही महिन्यात आम्हाला भेटायला आलेल्या लोकांमध्ये एक गोष्ट ठळकपणे जाणवायला लागली आहे. जवळजवळ प्रत्येकालाच कधीनाकधी तरी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु करायची इच्छा किंवा स्वप्न आहे. त्यांच्या भविष्यातील उद्दिष्टांच्या यादीत \’व्यवसाय सुरु करण्यासाठी रकमेची तजवीज\’ ही एक नोंद असते. आणि पंचविशीच्या वयोगटातील लोकांपासून पंचेचाळीशी पार केलेल्या – नोकरीत १८-२० वर्षे…

  • E0A497E0A581E0A482E0A4A4E0A4B5E0A4A3E0A581E0A495E0A580E0A4B8E0A4BEE0A4A0E0A58020E0A4B8E0A4B2E0A58DE0A4B2E0A4BEE0A497E0A4BEE0A4B020E0A495E0A4B6E0A4BEE0A4B2E0A4BE

    गुंतवणुकीसाठी सल्लागार कशाला

    गुंतवणूक सल्लागाराची गरज दोनेक आठवड्यांपूर्वीची गोष्ट असेल. एका स्नेह्यांकडील घरगुती समारंभात एकांशी भेट झाली. इकडच्या तिकडच्या गप्पाटप्पा झाल्या, काय करता वगैरे झाले. गुंतवणूक सल्लागार आहे म्हटल्यावर त्यांनी एकदम प्रश्न केला ‘माझ्याकडे आत्ता लाखभर रुपये आहेत, कुठली स्कीम सर्वात चांगली आहे गुंतवणूक करायला?’ त्यांची अपेक्षा होती मी त्यांना रेडीमेड काहीतरी योजना सुचवावी. मात्र माझ्यापुढे यक्षप्रश्न उभा…

  • E0A497E0A583E0A4B9E0A495E0A4B0E0A58DE0A49C20 20E0A4B2E0A4B5E0A495E0A4B020E0A4AAE0A4B0E0A4A4E0A4ABE0A587E0A4A120E0A495E0A4BF20E0A497E0A581E0A482E0A4A4E0A4B5E0A4A3E0A582E0A495

    गृहकर्ज – लवकर परतफेड कि गुंतवणूक

    गृहकर्ज – लवकर परतफेड कि गुंतवणूक? मागच्या एका लेखात लम्पसम किंवा बोनस आदी एकदम मिळालेल्या रकमेचे नियोजन कसे करावे लिहिताना म्हटले होते कि गृहकर्ज परतफेडीची घाई करण्याची गरज नाही. आजकाल जवळजवळ प्रत्येक पगारदार कुटुंबात एक तरी गृहकर्ज चालू असते आणि थोड्या बहुत काळाने उत्पन्न वाढेल तसा त्यांना हमखास पडणारा प्रश्न म्हणजे गृहकर्जाची लवकर परतफेड करावी…

  • E0A4AAE0A58DE0A4B0E0A589E0A4AAE0A4B0E0A58DE0A49FE0A580E0A4A420E0A4AAE0A588E0A4B8E0A58720E0A49FE0A4BEE0A495E0A4A3E0A4BEE0A4B0E0A49A20E0A485E0A4B8E0A4BEE0A4B220E0A4A4E0A4B0

    प्रॉपर्टीत पैसे टाकणारच असाल, तर

    रिअल इस्टेट – गुंतवणूक करताना कसा विचार करावा गेल्या काही लेखात आपण ‘रिअल इस्टेट ही सर्वसामान्यांसाठी एक चांगली दीर्घकालीन गुंतवणूक आहे’ या गैरसमजाचे खंडन केले. मात्र आपल्या प्रत्येकाच्या बघण्यात कोणी ना कोणी असं असतोच की ज्यांनी २५-३० वर्षांपूर्वी घेतलेली घरे किंवा वडिलोपार्जित मालमत्ता विकली आणि त्यातून चांगला परतावा मिळवला. मात्र या कालावधीत त्या प्रॉपर्टीच्या आजूबाजूला…

  • E0A4B0E0A4BFE0A485E0A4B220E0A487E0A4B8E0A58DE0A49FE0A587E0A49FE0A4AEE0A4A7E0A580E0A4B220E0A497E0A581E0A482E0A4A4E0A4B5E0A4A3E0A582E0A49520E0A495E0A4BFE0A4A4E0A58020E0A4B2E0A4BEE0A4ADE0A4A6E0A4BEE0A4AFE0A495

    रियल इस्टेटमधील गुंतवणूक किती लाभदायक

    रिअल इस्टेट आणि गुंतवणूक – ३ स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि आर्थिकदृष्ट्या बघायला गेल्यास ‘घर विकत घेणं’ हा कुठल्याही कुटुंबाच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय असतो. अर्थातच या बाबतीतला चुकीचा निर्णय आपल्या आर्थिक नियोजनाची ‘ऐसी की तैसी’ करून टाकू शकतो. आपण घर जर स्वतः राहण्यासाठी घेत असलो तर त्यातून भविष्यात परतावा काय मिळेल…

  • E0A498E0A4B020E0A4ACE0A4BEE0A49CE0A4BEE0A4B020E0A486E0A4A3E0A4BF20E0A495E0A4AEE0A4BEE0A488

    घर, बाजार आणि कमाई

    रिअल इस्टेट आणि गुंतवणूक – भाग २ गेल्या आठवड्यात आपण रिअल इस्टेटकडे गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून बघणे कितपत योग्य याचा एक धावता आढावा घेतला. भारतीय रिझर्व बँकेच्या २०१७ सालातील एका अहवालानुसार आपल्या देशातील सर्व व्यक्तींकडील वैयक्तिक संपत्तीचा ७६.९% भाग – म्हणजे तीन चतुर्थांशपेक्षा अधिक – हा रिअल इस्टेटमधे गुंतवलेला आहे. त्या खालोखाल ११% सोन्यातील गुंतवणूक आहे आणि…

  • E0A4B0E0A4BFE0A485E0A4B220E0A487E0A4B8E0A58DE0A49FE0A587E0A49F20E0A486E0A4A3E0A4BF20E0A497E0A581E0A482E0A4A4E0A4B5E0A4A3E0A582E0A495

    रिअल इस्टेट आणि गुंतवणूक

    रिअल इस्टेट आणि गुंतवणूक “हे घ्या पेढे!” आमच्या ऑफिसमधे विजयी मुद्रेने प्रवेश केलेल्या तांबे काकांनी ‘चितळे’चा बॉक्स पुढे केला. “अरे वा काका! कसले पेढे?” मी एक पेढा उचलत विचारले. “अगं, नवीन घराचं पझेशन मिळालं. हा काय आत्ताच बिल्डरच्या ऑफिसमधून येतोय!” काकांचं वाक्य ऐकलं आणि पेढ्याचा घास घशातच अडकला. “काय हो काका, हा कितवा फ्लॅट हो…

  • E0A4B6E0A58DE0A4B0E0A580E0A4AEE0A482E0A4A420E0A4AEE0A58020E0A4B9E0A58BE0A4A3E0A4BEE0A4B0

    श्रीमंत मी होणार!

    श्रीमंत मी होणार! गेल्या आठवड्यात आपण बघितलं की गुंतवणुकीच्या माध्यमातून श्रीमंत होणं ही वेळखाऊ आणि कंटाळवाणी प्रक्रिया आहे. त्यात जर आपल्याला काहीतरी थरार किंवा ‘एक्साईटमेन्ट’ची अपेक्षा असेल तर ती योग्य नाही. मात्र लवकर श्रीमंत व्हायची घाई प्रत्येकालाच झालेली असते. कधी एकदा जादूची कांडी फिरतेय आणि मी श्रीमंत होतो असे झालेले असते. मात्र महामार्गांवर जागोजागी लावलेली…

  • E0A4ACE0A58BE0A4A8E0A4B8E0A49AE0A58720E0A4A8E0A4BFE0A4AFE0A58BE0A49CE0A4A8

    बोनसचे नियोजन

    बोनसचे नियोजन आर्थिक नववर्षाची सुरुवात करून देणारा एप्रिलचा महिना बहुसंख्य नोकरदारांसाठी काही विशेष महत्त्वाचा असतो. सर्वसाधारणपणे ह्याच सुमारास त्यांचे वार्षिक अप्रैजल झालेले असते आणि त्यानुसार वार्षिक बोनस मिळणार असतो व पुढील वर्षासाठीची पगारवाढ ठरणार असते. बोनस किंवा तत्सम इतर कुठलाही एकरकमी मोठा निधी हातात आला की त्याच्या खर्चाला वाटा फुटायला वेळ लागत नाही. तसे होऊ…

  • E0A4B8E0A58BE0A4A8E0A58DE0A4AFE0A4BEE0A4A4E0A580E0A4B220E0A497E0A581E0A482E0A4A4E0A4B5E0A4A3E0A582E0A49520E0A495E0A4BFE0A4A4E0A58020E0A4B2E0A4BEE0A4ADE0A4A6E0A4BEE0A4AFE0A495

    सोन्यातील गुंतवणूक किती लाभदायक

    सोन्यातील गुंतवणूक भारतीयांचं सोन्यावरील प्रेम जगप्रसिद्ध आहे. आपल्याकडे सोन्याला भरभराटीची एक खूण मानली जाते, आणि ग्रामीण भागात तर शक्य असेल तेव्हा सोने खरेदी करण्यावर लोकांचा भर असतो. शहरी भागात देखील सणासुदीला लोक रांगा लावून सोने खरेदी करताना दिसतात. शतकानुशतके सर्वसामान्य भारतीयांची सोन्यावरची ही अढळ श्रद्धा, सोन्याला आपण दिलेलं धार्मिक-सामाजिक-सांस्कृतिक स्थान, त्याविषयीचं आकर्षण हे जगभरातील गुंतवणूक,…

  • E0A4AEE0A581E0A49AE0A58DE0A4AFE0A581E0A485E0A4B220E0A4ABE0A482E0A4A120E0A4B2E0A4BEE0A4ADE0A4BEE0A482E0A4B620E0A486E0A4A3E0A4BF20E0A495E0A4B0

    म्युच्युअल फंड, लाभांश आणि कर

    म्युच्युअल फंड, लाभांश आणि टॅक्स गेल्या लेखात म्हटलं होतं की गुंतवणूक करताना केवळ किती टॅक्स वाचतोय एवढेच बघणे पुरेसे नाही तर परताव्याच्या दृष्टीने देखील ती गुंतवणुक अधिकाधिक करसुलभ कशी असेल त्याचा प्रत्येकाने विचार करावा. त्याचंच अजून एक उदाहरण म्हणजे म्युच्युअल फंडातील परताव्याचे पर्याय. लाभांश वितरणावरील टॅक्समुळे तो पर्याय कधीचा कालबाह्य झालाय, पण असंख्य गुंतवणूकदार अजूनही…

  • E0A487E0A482E0A4A1E0A587E0A495E0A58DE0A4B8E0A587E0A4B6E0A4A820E0A4AEE0A58DE0A4B9E0A4A3E0A49CE0A58720E0A495E0A4BEE0A4AF20E0A485E0A4B8E0A4A4E0A58720E0A4B0E0A58720E0A4ADE0A4BEE0A48A

    इंडेक्सेशन म्हणजे काय असते रे भाऊ

    इंडेक्सेशन म्हणजे काय असते रे भाऊ? मार्चचा महिना म्हणजे आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना. करबचतीसाठी अजूनही अनेक लोक गुंतवणुकीचे पर्याय शोधत असतील. मात्र ज्यांनी दीर्घकालीन नियोजन आधीच करून ठेवले आहे ते निवांत असतील. मात्र त्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येकानेच अतिरिक्त निधी गुंतवण्यासाठी कर-सुलभ पर्याय कोणते याचा विचार केला पाहिजे. शेवटी गुंतवणुकीतून करोत्तर परतावा किती मिळतो ते प्रत्येकासाठी…

  • E0A486E0A495E0A4B8E0A58DE0A4AEE0A4BFE0A49520E0A4A8E0A4BFE0A4A7E0A58020E0A4B9E0A4BEE0A4A4E0A4BEE0A4B6E0A58020E0A4B9E0A4B5E0A4BEE0A49A

    आकस्मिक निधी हाताशी हवाच

    आर्थिक नियोजनाची सुरुवात? – \’आकस्मिक निधी\’ पासून! गेल्या आठवड्यात आपण बघितलं की चालढकल सोडून प्रत्येकाने आपल्या आर्थिक नियोजनाचं काम मार्गी लावलं पाहिजे. आर्थिक नियोजन हे काही परिपूर्ण शास्त्र नव्हे. आपली काहीतरी चूक होईल असा विचार करत कालापव्यय करण्यापेक्षा \’होऊनदेत थोड्या चुका, काही बिघडत नाही\’ असं म्हणून सुरुवात करणं कधीही श्रेयस्कर. जरी तुम्ही सर्वोत्तम पर्याय निवडले…

  • E0A4AEE0A581E0A4B2E0A4BEE0A482E0A4A8E0A4BE20E0A485E0A4B0E0A58DE0A4A5E0A4B8E0A4BEE0A495E0A58DE0A4B7E0A4B020E0A4ACE0A4A8E0A4B5E0A4BE20

    मुलांना अर्थसाक्षर बनवा

    अर्थशिक्षण पुढच्या पिढीचे नुकताच आम्ही आमच्या गुंतवणूक विषयक चर्चा करण्यासाठी म्हणूनच बनवलेल्या व्हॉट्सऍप ग्रुप मधल्या प्रत्येकाला प्रश्न विचारला की आपल्याला काय अजून नवीन करता येईल. त्यात अनेकांकडून एक महत्त्वाची सूचना आली की मुलांना योग्य वयातच गुंतवणूक विषयाचे प्राथमिक ज्ञान देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये हा दोष नक्कीच आहे की वैयक्तिक आर्थिक नियोजन किंवा…

  • E0A486E0A4AFE0A581E0A4B0E0A58DE0A4B5E0A4BFE0A4AEE0A58DE0A4AFE0A4BEE0A4B5E0A4BFE0A4B7E0A4AFE0A580E0A49AE0A58020E0A495E0A4BEE0A4B9E0A58020E0A4AEE0A4BFE0A4A5E0A495E0A482

    आयुर्विम्याविषयीची काही मिथकं

    आयुर्विम्याविषयीची काही मिथकं आयुर्विमा हा विषय वैयक्तिक आर्थिक नियोजनात फार महत्त्वाचा असूनही बऱ्याचदा त्याच्याकडे पुरेसं लक्ष दिले जात नाही. आयुर्विम्याचा संबंध मृत्यूशी असल्यामुळे त्यावर मोकळेपणाने चर्चा होत नाही. त्यामुळेच त्याविषयी अनेक चुकीचे समज निर्माण होतात आणि पसरत राहतात. सर्वसाधारणपणे समाजात असलेली अर्थशिक्षणाविषयी उदासीनता आणि विमाविक्रेत्यांनी पिढ्यानपिढ्या वापरलेल्या चुकीच्या मार्गांमुळे त्यात अजून भरच पडते. आज आपण…

  • Article

    गुंतवणुकीचं तंत्र आणि मंत्र

    गुंतवणुकीची काही पथ्यं डिसेंबर महिना सुरु झाला आहे आणि गुलाबी थंडीच्या चाहुलीसोबत शेअर बाजाराने घेतलेल्या भरारीने इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदार सुखावले असतील. साहजिकच अनेकांना सप्टेंबर-ऑक्टोबर मधली बाजारातील पडझड, त्यावेळी एकामागून एक येणाऱ्या निराशाजनक आर्थिक बातम्या, \’येणारा काळ अजून खराब कसा असेल\’ ह्या विषयीच्या चर्चा वगैरे गोष्टींचा काहीसा विसर पडला असेल. मात्र शेअर बाजार म्हटलं की…

  • Article 1

    गुंतवणुकीची उद्दिष्टे, उत्साह अन् उल्हास

    गुंतवणुकीतील एक्साईटमेंट “हेलो!” “नमस्कार! काय म्हणताय डॉक्टर?” “काही नाही, जरा माझ्या पोर्टफोलिओबद्दल बोलायचं होतं. मी तो रोज बघतोय, त्यात काहीच एक्सायटिंग होत नाहीये. ते येस बँक, टाटा मोटर्सचे शेअर्स बघा ना, एका महिन्यात ५०%-६०% पळाले. आपल्याला काही बदल करायला हवेत का? ‘इक्विटी एक्स्पोजर’ वाढवायला हवेय का?” गेल्याच महिन्यात आलेला हा एका क्लाएन्टचा हा फोन मला…

  • E0A497E0A58BE0A4B7E0A58DE0A49F20E0A4A6E0A58BE0A4A820E0A497E0A581E0A482E0A4A4E0A4B5E0A4A3E0A582E0A495E0A4A6E0A4BEE0A4B0E0A4BEE0A482E0A49AE0A580

    गोष्ट दोन गुंतवणूकदारांची!

    गोष्ट दोन गुंतवणूकदारांची! बहुसंख्य लोकांचा असा समज असतो की \’गुंतवणूक करणं\’ आणि \’यशस्वी गुंतवणूकदार बनणं\’ या दोन्ही एकसारख्याच गोष्टी आहेत. प्रत्यक्षात या विभिन्न गोष्टी आहेत आणि त्यांचा अनेकदा परस्परसंबंध नसतो. म्हणजेच \’गुंतवणूक कशी करावी\’ हे माहिती झाले म्हणजे आपण आपोआप एक यशस्वी गुंतवणूकदार बनू शकतो असे अजिबात नाही. सिंहगडाचा ट्रेक करणे आणि एव्हरेस्टचा ट्रेक करणे…

  • E0A486E0A4AFE0A581E0A4B0E0A58DE0A4B5E0A4BFE0A4AEE0A4BE20E0A49FE0A4B0E0A58DE0A4AE20E0A4AAE0A58DE0A4B2E0A4BEE0A4A8E0A49AE0A58720E0A4AEE0A4BEE0A4B9E0A4BEE0A4A4E0A58DE0A4AEE0A58DE0A4AF

    आयुर्विमा टर्म प्लानचे माहात्म्य

    आयुर्विमा: टर्म प्लानचे माहात्म्य आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढत्या अनिश्चिततेला पाहता ‘आयुर्विम्याला पर्याय नाही’ ही खरीच गोष्ट आहे. स्वतःला जबाबदार म्हणवणाऱ्या प्रत्येक कमावत्या व्यक्तीने स्वतःच्या आयुष्याचा विमा काढणे ही अनिवार्य गोष्ट समजली पाहिजे. मात्र गेल्या दोन लेखात बघितल्याप्रमाणे तुम्ही त्याची सांगड गुंतवणुकीशी घालायचा प्रयत्न केलात तर ‘तेल ही नाही, तूप ही नाही’ अशी अवस्था होऊन बसते.…

  • E0A4ABE0A4B8E0A4B5E0A58DE0A4AFE0A4BE20E0A4B5E0A4BFE0A4AEE0A4BE20E0A4AAE0A58BE0A4B2E0A580E0A4B8E0A580E0A482E0A49AE0A4BE20E0A4B8E0A4BEE0A4AAE0A4B3E0A4BE

    फसव्या विमा पोलीसींचा सापळा

    गुंतवणूक आणि आयुर्विमा? नाही, कधीच नाही! गेल्या आठवड्यात आपण बघितलं की एन्डोमेंट किंवा मनी-बॅक सारख्या पारंपारिक आयुर्विमा पॉलिसी आपल्याला कधीच पुरेसं विमा संरक्षण देऊ शकत नाहीत. बहुतांशी त्या दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आणि करबचतीसाठी म्हणून विकल्या जातात. ह्या पॉलिसी गळ्यात बांधण्यासाठी जे दीर्घकालीन गुंतवणूक आणि आकर्षक परताव्याचे गाजर आपल्याला दाखवले जाते त्याचा परामर्ष घेऊ. जेव्हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी…

  • E0A495E0A4B0E0A4ACE0A49AE0A4A4E0A580E0A4B8E0A4BEE0A4A0E0A58020E0A497E0A581E0A482E0A4A4E0A4B5E0A4A3E0A582E0A49520E0A495E0A580

    करबचतीसाठी गुंतवणूक की

    गुंतवणूक आणि करबचत झी मराठी दिशाच्या सर्व वाचकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! नवीन २०१९ वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही सर्वांनी आपापल्या कुटुंबासाठी आर्थिक नियोजनाचा आराखडा बनवला असेल. आता आपण ही गुंतवणूक कुठे, कशी करावी, त्याचा साकल्याने कसा विचार करावा हे पाहू. नवीन वर्षाची सुरुवात हा करदात्यांचा बहुतेकदा कर सवलतींसाठी गुंतवणुकी करण्याचा काळ असतो. तेव्हा आज आपण गुंतवणुकी…

  • E0A497E0A581E0A482E0A4A4E0A4B5E0A4A3E0A582E0A49520E0A486E0A4A3E0A4BF20E0A486E0A4AFE0A581E0A4B0E0A58DE0A4B5E0A4BFE0A4AEE0A58DE0A4AFE0A4BEE0A49AE0A58020E0A497E0A4B2E0A58DE0A4B2E0A4A4

    गुंतवणूक आणि आयुर्विम्याची गल्लत

    आयुर्विम्याला पर्याय नाही! (पण आयुर्विमा म्हणजे गुंतवणूक नाही) दीर्घकालीन गुंतवणुकीप्रमाणेच आयुर्विमा हे आपल्या सर्वांच्या आयुष्यातील आर्थिक गणिताचं एक अविभाज्य अंग आहे. खरंतर आयुर्विमा ही गोष्ट इतकी महत्वाची आहे की समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात इथून करायला हवी. दोनएक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या एका शाळेतील मैत्रिणीचा मेसेज आला. तिच्या घराजवळ राहणाऱ्या मैत्रिणीच्या नवऱ्याचा दुर्दैवाने थोड्याच…

  • E0A4AEE0A581E0A4A6E0A4A4E0A4A0E0A587E0A4B5E0A580E0A482E0A49AE0A58720E0A497E0A4A3E0A4BFE0A4A4

    मुदतठेवींचे गणित

    मुदतठेवींचे गणित : सिर्फ दिखावे पे मत जाओ ! रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचा राजीनामा आणि पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल, त्याचसोबत आंतरराष्ट्रीय बाजारातील विविध घडामोडी, ह्यामुळे गेल्या आठवड्यात शेअर बाजारात चांगलीच धामधूम दिसून आली. मागील लेखात आपण बघितले की बाजाराच्या अशा गटांगळ्या बघताना आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे. अर्थात खरोखर वेळ आली की भलेभले स्वतःला जिगरबाज समजणारे…

  • E0A4AFE0A581E0A4B2E0A580E0A4AAE0A49AE0A58DE0A4AFE0A4BE20E0A49CE0A482E0A49CE0A4BEE0A4B3E0A4BEE0A4A41

    युलीपच्या जंजाळात

    युलीपच्या जंजाळात नुकताच आमच्या एका स्नेह्यांकडे काही घरगुती समारंभानिमित्त जाणे झाले. पाहुण्यांची बोळवण करून जरा निवांत झालेले यजमान काका हुश्श करत बसले आणि मला म्हणाले ‘अगं तुला जरा वेळ आहे का? जरा एक विचारायचं होतं.’ ही प्रस्तावना आता माझ्या चांगल्याच ओळखीची झाली आहे. लोकांना वैयक्तिक आर्थिक नियोजनाबद्दल असंख्य शंका असतात, पण कोणाला विचारू, कसं विचारू…

  • सोन्यात गुंतवणूक किती आणि कशी

    सोन्यातील गुंतवणूक – भाग २ गेल्या लेखात आपण बघितले की सोने हे मूलतः निरुत्पादक असल्यामुळे त्याकडे एक गुंतवणूक पर्याय म्हणून बघणे खरेतर चुकीचे आहे. तरी सुद्धा भारतीयांच्या सोन्याची साठवणूक करण्याच्या सवयीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. जागतिक सुवर्ण मंडळाच्या अंदाजाप्रमाणे भारतीयांनी आतापर्यंत तब्बल २४००० टन सोन्याचा साठा करून ठेवला आहे, जो दरवर्षी वाढतोच आहे. तुलना…

  • Blog 2

    आता नको, मग नको

    आर्थिक नियोजन आणि चालढकल – कल करे सो आज कर! गेल्याच आठवड्यात एकीचा फोन आला. आर्थिक नियोजनाबद्दल बोलायचंय म्हणाली. आमच्या एका मित्राच्या ऑफिसमधे काम करते आणि त्यानेच माझा फोन नंबर दिल्याचं सांगितलं. गप्पा झाल्या, भेटायचं कधी ते ठरलं, पण त्यापुढे तिने जे सांगितलं ते ऐकून मी विचारात पडले. ती म्हणाली गेलं सुमारे दीड वर्ष ती…

  • Article 2

    चक्रवाढीची जादू

    चक्रवाढीची जादू! आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्यात प्रगती करण्यासाठी आपण त्या त्या क्षेत्रातील अनुभवी लोकांशी संवाद साधायची संधी शोधत असतो. कारण अशा संवादातून आपली मतं, गृहितकं, सिद्धांत तपासून बघता येतातच, पण काही वेळा आपल्याला माहित असलेल्या गोष्टींकडे बघण्याचा नवीनच दृष्टीकोन गवसतो. गेल्याच आठवड्यात अशा गुंतवणूक क्षेत्रातील एका दिग्गज व्यक्तीचं व्याख्यान ऐकण्याचा योग आला. त्यांची…

  • E0A489E0A4A4E0A58DE0A4AAE0A4A8E0A58DE0A4A8E0A4BEE0A4A8E0A581E0A4B8E0A4BEE0A4B020E0A4B5E0A4BEE0A4A2E0A4B5E0A4BE20E0A497E0A581E0A482E0A4A4E0A4B5E0A4A3E0A582E0A495

    उत्पन्नानुसार वाढवा गुंतवणूक

    आर्थिक नियोजन: गुंतवणुकीचं गणित असंख्य सामान्य गुंतवणूकदारांना आर्थिक नियोजन, गुंतवणूक योजना, दीर्घकालीन महागाईची गृहितकं आणि त्याचे परिणाम, आर्थिक उद्दिष्टे इत्यादी संकल्पना आणि त्यासाठी करावी लागणारी आकडेमोड ह्यांचा मनस्वी तिटकारा किंवा अनामिक भीती (fobia) असते. त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी आपल्या भविष्यासाठी महत्त्वाच्या आहेत हे समजून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष किंवा चालढकल करणे हेच चालू राहातं. त्यातून चुकीचे…

  • E0A486E0A4A7E0A580 E0A495E0A4B3E0A4B8 E0A4AEE0A497 E0A4AAE0A4BEE0A4AFE0A4BE

    आधी-कळस-मग-पाया

    सुनिश्चित उद्दिष्टे: आर्थिक नियोजनाची पहिली पायरी दोन आठवड्यापूर्वी आपण इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसंदर्भात काय पथ्यं पाळावीत ते बघितलं, त्यात ‘सुनिश्चित उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी गुंतवणूक’ करणे गरजेचे आहे असे म्हटलं होतं. तसं बघायला तर ऐकणाऱ्याला हा सल्ला अगदीच गुळमुळीत किंवा बाळबोध वाटू शकतो. कारण आपण ह्याचा खोलात जाऊन विचार का करायला पाहिजे, आणि तो कसा करायला पाहिजे,…